Mobile-Online Public Access Catalogue (M-OPAC)

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी यांना सुचित करण्यात येते की, LIBRARY MANAGEMENT SOFTWARE (LIB-MAN) अंतर्गत संपूर्ण ग्रंथालय हे संगणकीकृत झालेले आहे. या सर्व संगणकीकृत प्रणालीचा वापर आपणास करता यावा यासाठी स्मार्ट फोन आधारित M-OPAC हे अँप विकसित करण्यात आलेले आहे. आपण PLAY STORE मधुन सदरील अँप आपल्या मोबाईलवर INSTALL करावे त्याची लिंक खाली दिलेली आहे. 

https://play.google.com/store/apps/details?id=com.iitms.mobileopac

सदरील अँप आपल्या मोबाईलवर INSTALL केल्यानंतर LIBRARY BORROWER वर जाऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव सर्च करावे. नंतर आपणास युजर नेम आणि पासवर्ड लागेल. प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी युजर नेम आणि पासवर्ड सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती एम. व्ही. पाटील यांच्याकडून घ्यावा.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस महाविद्यालयाचा जो PRN No. दिला जातो तो त्यांनी युजर नेम आणि पासवर्ड म्हणून वापरावा. नंतर पासवर्ड बदलावा.

M-OPAC अँपचे फायदे

  1. वेगवेगळ्या टॅगद्वारे ग्रंथ शोधु शकता जसे की, शीर्षक, लेखक, प्रकाशक, विभाग, कीवर्ड आणि ग्रंथाचा दाखल क्रमांक नुसार.
  2. वेगवेगळ्या टॅगद्वारे नियतकालिक शोधु शकता जसे की, नियतकालिका शीर्षक, श्रेणी, विभाग, प्रकाशक, नियतकालिकेचा प्रकार, आय. एस. एस. एन. क्रमांक . नुसार.
  3.  वेगवेगळ्या टॅगद्वारे प्रबंध/संशोधन प्रकल्प शोधु शकता जसे की, शीर्षक, लेखक, मार्गदर्शक, कीवर्ड, दाखल क्रमांक, विभाग नुसार.
  4. ग्रंथालयातील पुस्तकांचे देवाण-घेवाण बाबतचे संदेश आपणास मोबाईल Text Messages द्वारे मिळतील.
  5. Books Issue-Return- ग्रंथालयाचे किती ग्रंथ आपल्या नावावर आहे हे आपण मोबाईलवर बघु शकता.
  6. New Arrival- ग्रंथालयात कोणकोणते नवीन ग्रंथ आलेले आहे हे आपण आपल्या मोबाईलवर बघु शकता.
  7. Books Transaction History-आज पर्यंत ग्रंथालयाचे कोण-कोणते ग्रंथ आपण वाचलेली आहेत हे आपण आपल्या मोबाईलवर बघु शकता.
  8. ग्रंथालयात आल्यावर आपली उपस्थिती ही QR-CODE द्वारे नोंदवू शकता.    
तरी या सर्व सुविधांचा वापर करण्यासाठी M-OPAC अँप INSTALL करावे.
अधिक माहितीसाठी ग्रंथालयाशी संपर्क साधावा.
ग्रंथपाल, डॉ. ए. बी. सवाई (8087484788)
सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती एम. व्ही. पाटील (9763859599)




No comments:

Post a Comment