N-List consortia and how to used it

About N-List Consortia: भारतातील विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये सुसूत्रता आणण्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) INFLIBNET ची स्थापना केली. INFLIBNET द्वारे National Library Information Services Infrastructure for Scholarly Content (N-List) हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. N-List कन्सोर्शीयाच्या माध्यमातून ई-संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. N-List मध्ये 1,99,000+ पेक्षा जास्त E-Books आणि 6000+ पेक्षा जास्त E-Journals उपलब्ध आहेत. ऑनलाईन नियतकालिके व ऑनलाईन डेटाबेस वाचनसाहित्य याचा कायदेशीर वापर करणे आणि सभासदत्व घेणे हे N-List कन्सोर्शीयामुळे शक्य झाले आहे. महाविद्यालय N-List चे दरवर्षी सभासद शुल्क अदा करून प्राध्यापक,विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी यांना निशुल्क सभासदत्व दिले जात आहे. तरी सर्वांनी N-List चे सभासदत्व घेण्यासाठी पुढील सूचनेचे पालन करावे.

N-List RegistrationN-List कन्सोर्शीयाचे सभासद (Member) होण्याकरिता प्राध्यापक, विद्यार्थी यांनी खालील दिलेल्या गुगल- फॉर्म लिंकद्वारे आपली स्वतःची माहिती [ नाव,ई-मेल आयडी, मोबाईल नं, डेसिगनेशन (जसे-प्राध्यापक,विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी) ,डिपार्टमेंट इ.] भरून गुगल  फॉर्म सबमिट करावे. कॉलेज अडमीन आपण सबमिट केलेली माहिती  N-List कडे पाठविलेनंतर आपणास स्वतःच्या ई-मेलवर Member Activation चा मेल पाप्त होईल.

Registration Form Link :  https://forms.gle/xBtVRd4Z5x8gXVRh6

Get Activation E-Mail: गुगल- फॉर्म मध्ये दिलेल्या  ईमेलवर आयडी वर  खालीलप्रमाणे  N-List मार्फत Member Activation चा मेल मिळेल. यामध्ये आपणास User IDPassword (One Time Password) प्राप्त होईल. तसेच या मेलमध्ये OTP चा वापर करून Password Set करण्याकरिता सोबत दिलेल्या कंसातील  You need to activate your username using the OTP and set your desired password using https://nlist.inflibnet.ac.in/vactivate.php. ]  लिंक मिळेल त्यावर क्लिक करून दिलेला User IDPassword (One Time Password)  च्या आधारे तुम्हाला तुमचा इच्छित पासवर्ड सेट करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही Set केलेल्या Password च्या आधारे N- List मध्ये Members Login मधून .User ID व Password वापरून  प्रवेश करता येईल. 

Sample of  User Activation Email


N-List  Member's Login :N-List  मधील ई-संसाधने पाहण्याकरिता खालील लिंकद्वारे N-List होम पेजवरील Members Login मध्ये User ID म्हणजे स्वतःचा ईमेल व Password टाकून Login करावे.यानंतर Member User Consent हे पेज ओपन होईल यामध्ये Accept वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-संसाधने उपलब्ध होतील.

N-List Link : https://nlist.inflibnet.ac.in/index.php

                                                                     Home Page of N-List

N-List Home Page

Member user content

Access E-Resources : एकदा यशस्वीपणे Login झाल्यानंतर  N-List  मधील आपणास हव्या असलेल्या प्रकाशकाची ई-संसाधने ऑंनलाईन (Read) वाचता येतात,चाळता (Browse) येतात, तसेच जतन (Save) करता येतात.

E-Resources

Demo Video on...
Use and Awareness about N-List E-Resources


(Click on it to watch the video)

ज्या विद्यार्थ्यानी स्वतःचा ई-मेलआयडी तयार केलेला नसेल किंवा सदरील प्रक्रियेमध्ये काही अडचणी येत असतील तर अशा  विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या युअर नेम (ई-मेल आयडी) आणि पासवर्ड च्या आधारे ई-संसाधनाचा वापर करू शकता.
USERNAME: vpcvlibrary@gmail.com
PASSWORD: Vi181217727

सूचना :
N-List Database वापरण्याबाबत युजरना काही समस्या असल्यास त्यांनी N-List ऍडमिन यांच्याशी संपर्क साधावे.


N-LIST College Admin Details:
Dr. Amol Babasaheb Sawai
Librarian
Vinayakrao Patil Mahavidyalaya Vaijapur.
Email Id: amolsawai123@gmail.com
Mob. 80878484788





No comments:

Post a Comment